प्रभाव तारीख: 21/09/2021
गोपनीयता वचनबद्धता
Rebar Interactive, LLC (“Rebar Interactive” “आम्ही,” “आमचे,” “आम्हाला”) ला समजते की तुमच्यासाठी गोपनीयता महत्त्वाची आहे आणि त्याचे संरक्षण करण्यास आणि सर्व व्यक्तिगत डेटा संरक्षित केले जाईल याची खात्री करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. हे गोपनीयता-धोरण Rebar Interactive ने विकसित केलेल्या, देखभाल करत असलेल्या आणि ऑपरेट करत असलेल्या सर्व वेबसाईटना लागू आहे.
Rebar Interactive हे एक चिकित्सालयीन परीक्षण सोल्यूशन प्रदाता आहेत जे चिकित्सालयीन परीक्षणामध्ये रुग्णांना सहभागी करण्यास, भरती करण्यास आणि राखण्यास तंत्रज्ञानाचा वापर करतात. चिकित्सालयीन आणि वैद्यकीय संशोधन हे सर्वाधिक गोपनीय आणि व्यक्तिगत डेटाच्या संकलनावर आणि विश्लेषणावर विसंबून असते. आमच्या वेबसाईटवरून आम्ही तुमच्याबद्दल जी माहिती गोळा करतो, ती या गोपनीयता-धोरणानुसार आणि लागू असलेल्या कायद्यांच्या, नियमांच्या आणि विनियमकांनुसार राखली आणि वापरली जाईल. आमच्या वेबसाईटचा अॅक्सेस करून, तुम्ही येथे पुढे सेट करण्यात आलेल्या अटी आणि शर्ती मान्य करता. या गोपनीयता-धोरणामधील कोणत्याही अटी किंवा शर्ती तुम्हाला मान्य नसल्यास, कृपया आमच्या वेबसाईटचा कोणताही भाग अॅक्सेस करू नये किंवा वापरू नये.
आम्ही डेटा “प्रोसेसर” म्हणून कामगिरी करतो जो चिकित्सालयीन परीक्षणांचे प्रायोजक, चिकित्सालयीन संशोधन संघटना (CROs), आणि चिकित्सालयीन संशोधन केंद्र यांच्या वतीने व्यक्तिगत डेटावर प्रक्रिया करतो. हे गोपनीयता-धोरण पूर्णपणे काळजीपूर्वक वाचण्यासाठी तुम्ही जबाबदार असणार आहात. आम्ही तुमचा व्यक्तिगत डेटा कसा संकलित करतो, वापरतो आणि संरक्षित करतो; आणि आम्ही डेटा गोपनीयता आणि गुप्तता यावरील कायद्याचे कसे पालन करतो, त्याचे हे धोरण स्पष्टीकरण देते.
व्यक्तिगत आरोग्य माहितीच्या (“PHI”) (खाली विषद केल्यानुसार) समावेशासह तुमची व्यक्तिगत ओळखण्यायोग्य माहिती (“PII”) (खाली विषद केल्यानुसार) आम्हाला प्रदान करून, तुम्ही या गोपनीयता-धोरणानुसार तुम्ही प्रदान करत असलेल्या कोणत्याही माहितीच्या संकलनाला संमती देता.
Rebar Interactive हे Rebar Interactive च्या वतीने किंवा सह काम करत असलेल्या तृतीय पक्षांमध्ये माहितीला आणि अशी माहिती या गोपनीयता-धोरणाच्या अटीनुसार शेअर करून शकतात.
Rebar Interactive हे युनायटेड स्टेट्स फेडरल ट्रेड कमिशन (FTC) च्या अन्वेषक आणि अंमलबजावणी प्राधिकरणाच्या अधीन आहेत.
आम्ही संकलित करत असलेली माहिती
Rebar Interactive तुम्ही आम्हाला प्रदान करत असलेली सर्व माहिती संकलित करते.
यामध्ये तुम्ही जेव्हा आमच्या न्यूजलेटरला सबस्क्राईब करता, सर्वेक्षणाला प्रतिसाद देता किंवा फॉर्म भरता, तेव्हा, तुम्ही प्रदान करत असलेल्या माहितीचा समावेश होतो. मात्र तेवढ्या पुरतेच मर्यादित नाही. आमची सर्वेक्षणे किंवा फॉर्म तुम्हाला पुढील माहिती प्रविष्ट करण्यास सांगू शकतात: नाव किंवा ई-मेल पत्ता. तथापि, तुम्ही आमच्या साईटला निनावीपणे भेट देऊ शकता. तुम्ही अशी माहिती आम्हाला स्वेच्छेने प्रदान केल्यास, आम्ही फक्त (खाली विषद केल्याप्रमाणे) PHI च्या समावेशासह (खाली विषद केल्याप्रमाणे) PII संकलित करतो.
कुकीज, बिकन्स, वेब लॉग्ज आणि तत्सम ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खाली वर्णन केल्याप्रमाणे आम्ही स्वयंचलितपणे माहिती संकलित करू.
कुकीज
कुकीजच्या वापरातून आम्ही आमच्या वेबसाईटच्या तुमच्या वापराबाबत न-ओळखता येणारा वेब वापर डेटा संकलित करतो. कुकी हा माहितीचा छोटा तुकडा असतो जो जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाईट अॅक्सेस करता तेव्हा आमचा सर्व्हर तुमच्या वेब ब्राऊझरला पाठवतो. आमच्या वेबसाईट अॅक्सेस करणाऱ्या प्रत्येक संगणकाला Rebar Interactive द्वारे एक भिन्न कुकी नियुक्त केली जाते. कुकीज या अनेक प्रकारचा ओळखता न येणारा डेटा संग्रहित करण्यास सक्षम असतात. कुकीज आम्हाला आमच्या वेबसाईटचा वापर विश्लेषित करण्यासाठी, भविष्यातील तुमच्या भेटींसाठी तुमची प्राधान्ये समजावून घेण्यास आणि जतन करण्यास आणि साईटवरील वाहतूकीबद्दल सरासरी डेटा एकत्रित करण्यास (ज्यामुळे आम्ही भविष्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारच्या साईट अनुभव आणि साधने ऑफर करू शकू) किंवा वेबसाईटच्या अल्पवयीन वापराला प्रतिबंधित करण्यास, वापरल्या जाऊ शकतात.
तुमच्या परवानगीशिवाय आम्ही कुकीजमधून मूलभूत डेटा PII सह लिंक करत नाही आणि आम्ही तुमच्या बद्दलची PHI संकलित किंवा संग्रहित करण्यास कुकीज वापरत नाही.
बहुतांश इंटरनेट ब्राऊझरचा ऑप्शन/सेटिंग्ज विभाग तुम्हाला कुकीज आणि तुमच्या उपकरणामध्ये हस्तांतरित केली जाऊ शकणारी इतर तंत्रज्ञाने कशी व्यवस्थापित करावी याबाबत सांगेल, यामध्ये हे तंत्रज्ञान कसे अक्षम केले जाऊ शकते याचाही समावेश होतो. तुम्ही तुमच्या ब्राऊझरच्या सेटिंग्जमधून आमच्या किंवा सर्व कुकीज अक्षम करू शकता, परंतु कृपया नोंद घ्या की कुकीज अक्षम करण्याने आमच्या सेवांच्या वैशिष्ट्यांपैकी काहींवर प्रभाव पडू शकतो आणि काही सेवा योग्य प्रकारे काम करू शकणार नाहीत.
आमच्या सेवांच्या तुमच्या वापराबद्दल माहिती संकलित करण्यास आणिसंग्रहित करण्यास आम्ही तृतीय पक्षांना वापरू किंवा सहभागी करू शकतो, जेलोकल स्टोअर्ड ऑब्जेक्ट्स (LSOs) वापरतात, काही वेळा त्यांना “फ्लॅश कुकीज” म्हणून देखील संदर्भित केले जाते आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर करू शकतो. फ्लॅश कुकी ही एक लहान डेटा फाईल असते जी Adobe Flash टेक्नॉलाजीचा वापर करून तुमच्या उपकरणामध्ये ठेवलेली असते. फ्लॅश कुकीज या वर वर्णन केलेल्या कुकीजपेक्षा वेगळ्या असतात कारण तुमच्या ब्राऊझरमध्ये प्रदान केलेली कुकीज व्यवस्थापन साधने त्यांना हटवत नाहीत. तुमच्या उपकरणावरील माहिती संग्रहित करू शकणाऱ्या फ्लॅश कुकीज मर्यादित करण्यास, तुम्ही Adobe वेबसाईटला भेट दिली पाहिजे:
http://www.macromedia.com/support/documentation/en/flashplayer/help/settings_mana ger07.html
वेब बिकन्स, IP पत्ते आणि तत्सम ट्रॅकिंग तंत्रज्ञान
जेव्हा तुम्ही आमच्या सेवांना भेट देता, आम्ही काही विशिष्ट उद्देशांसाठी, उदाहरणार्थ तुम्ही आमच्या सेवा कोणत्या प्रदेशातून नेव्हिगेट करता त्याचे निरीक्षण करण्यासाठी तुमचा IP पत्ता संकलित करू शकतो. IP पत्ता हा असा नंबर असतो जो तुमच्या इंटरनेट सेवा प्रदात्याकडून तु्म्हाला नियुक्त केला जातो ज्यामुळे तुम्ही इंटरनेट अॅक्सेस करू शकता. जरी आम्हाला तुमचे IP पत्ते मिळाले, तरी देखील आम्ही त्यांचा वापर तुम्हाला व्यक्तिगतरीत्या ओळखण्यासाठी करत नाही किंवा इतरांना ते उघड करत नाही. आमच्या सेवांच्या तुमच्या वापराबद्दल आणि आमच्याकडून केल्या ईमेलसह आंतरक्रियांच्याबद्दल माहिती एकत्रित करण्यास देखील आम्ही बीकन्स एकटे किंवा कुकीजच्या संयोगासोबत वापरू शकतो. वेब बीकन्स ह्या स्पष्ट इलेक्ट्रॉनिक प्रतिमा असतात ज्या तुमच्या संगणकावरील विशिष्ट प्रकारची माहिती जसे की कुकीज ओळखू शकतात, जेव्हा तुम्ही वेब बीकनला बांधलेली एक विशिष्ट साईट पाहिलेली असते. आम्ही वेब बीकन्सचा वापर आमच्या सेवा चालविण्यास आणि सुधारण्यास वापरू शकतो.
वेब लॉग्ज
Rebar Interactive हे आमच्या वेबसाईटला तुमच्या भेटीबद्दलचा बेसिक डेटा रेकॉर्ड करणारे मानक वेब लॉग्ज वापरतात, जसे की भेटीची तारीख आणि वेळ, भेटीच्या वेळी पाहिलेली पृष्ठे आणि तुमच्या इंटरनेट सेवा प्रदात्याचे डोमेन नाव.
आम्ही सामान्यपणे वेब लॉग्जमधून व्यक्तींना शोधून काढत नाही. तथापि, आम्ही वेब लॉग्जचा वापर अशा व्यक्तीला ओळखण्यासाठी करू शकतो ज्याने आमच्या वेबसाईटना हानी पोहोचवण्याचा किंवा अनधिकृत मार्गाने वापरण्याचा प्रयत्न केल्याची आम्हाला शंका आहे. संगणक सुरक्षितता किंवा संबंधित कायदे यांचे उल्लंघन झाले आहे असा आम्हाला विश्वास असल्यास किंवा लागू असलेल्या कायदा किंवा कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यासाठी आवश्यक असेल तसे आम्ही आमच्या कायदा अंमलबजावणी एजन्सीसह वेब लॉग्ज शेअर करू शकतो. याशिवाय,आम्ही आमचे वेब लॉग्ज (ज्यामध्ये कोणत्याही PII चा समावेश नाही), चिकित्सालयीन संशोधन अभ्यासासाठी त्याच्या वेबसाईट अधिक चांगल्या प्रकारे डिझाइन करण्यास साहाय्य करण्यास आमच्या भागीदारांसह शेअर करू शकतो.
उपकरण आणि ऑनलाइन वापर
आम्ही तुमच्या संगणक, ब्राऊझर, मोबाईल किंवा तुम्ही आमच्या सेवा अॅक्सेस करण्यासाठी वापरता अशा अन्य उपकरणाबद्दल माहिती संकलित करू शकतो. आम्ही अशी माहिती संकलित करण्यासाठी कुकीज, पिक्सेल, लॉग फाइल्स आणि इतर तंत्रांचा वापर करू शकतो, ज्यामध्ये IP पत्ता, टाईम झोन, उपकरण ओळखकर्ते आणि इतर अनन्य ओळखकर्ते ब्राऊझर प्रकार, ब्राऊझर भाषा,ऑपरेटिंग सिस्टिमचे नाव आणि आवृत्ती, उपकरणाचे नाव आणि मॉ़डेल, आवृत्ती, संदर्भ देणारी आणि बाहेर पडतानाची पृष्ठे, सेवा अॅक्सेस करण्याच्या तारखा आणि वेळा, क्लिक केलेल्या लिंक्स, वापरलेली वैशिष्ट्ये, क्रॅश अहवाल आणि सत्र ओळखणारी माहिती यांच्या समावेश होतो.
तृतीय पक्षांचे स्वयंचलित संकलन आणि विश्लेषण सेवा
आम्ही आमच्या सेवांची कार्यात्मकता, वैशिष्ट्ये, किंवा वितरण सुधारण्यासाठी मर्यादेविना विश्लेषण सेवा प्रदात्यांच्या समावेशासह काही विशिष्ट तृतीय पक्षांचा वापर करू शकतो. आम्ही या तृतीय पक्षांना आमच्या डिजीटल मालमत्तांवर टॅग ठेवण्यास आणि माऊस क्लिक्स, माऊस हालचाली, स्क्रोल करण्याच्या क्रिया, त्याच प्रमाणे आमच्या सेवांवर तुम्ही टाईप करत असलेला कोणताही मजकूर रेकॉर्ड करण्याची अनुमती देखील देऊ शकतो. उदाहरणार्थ, आम्ही वापरकर्ता ट्रेण्ड आणि वापर यांचा मागोवा ठेवण्यासाठी आमच्या सेवेवर Google Analytics चा वापर करतो. आमच्या सेवांशी संबंधित असल्यामुळे तुमच्या माहितीवरील Google Analytics च्या प्रक्रियेवरील अधिक विशिष्ट माहितीसाठी, कृपया खालील Google Analytics विभाग पाहा.
Google Analytics
Google, एक तृतीय पक्ष विक्रेता म्हणून, तुमच्या साईटवर जाहिराती लावण्यासाठी कुकीजचा वापर करतो. Google चा DART कुकीजचा वापर आमच्या साईटला आणि इंटरनेटवरील इतर साईटना तुमच्या भेटीच्या आधारावर जाहिराती देऊ करण्यास सक्षम करतो. तुम्ही Google जाहिरात आणि सामग्री नेटवर्क गोपनीयता-धोरणाला भेट देऊन DART कुकीजचा वापर वगळू शकता.
आमच्या वेबसाईट Google Maps किंवा Google Analytics ही, Google, Inc. (“Google”) द्वारे प्रदान केली जाणारी एक वेब विश्लेषण सेवा वापरू शकतात, जी वापरकर्ता साईटचा वापर कसा करतो त्याचे विश्लेषण करण्यासाठी कुकीजचा वापर करते. वेबसाईटच्या तुमच्या वापराबद्दल कुकीजद्वारे उत्पन्न केलेली माहिती (तुमच्या IP पत्त्याच्या समावेशासह) Google ला Google च्या गोपनीयता-धोरणाच्या खाली [Rebar Interactive च्या वतीने] हस्तांतरित आणि द्वारे संग्रहित केली जाईल:
Google: http://www.google.com/intl/en/analytics/privacyoverview.html
तुमच्या ब्राऊझरवरील उचित सेटिंग्जचा वापर करून तुम्ही कुकीजचा वापर नाकारू शकता, तथापि, कृपया नोंद घ्या की तुम्ही तसे केल्यास तुम्ही आमच्या वेबसाईटची पूर्ण कार्यात्मकता वापरू शकणार नाही. आमच्या वेबसाईट वापरून वर सेट करण्यात आलेल्या पद्धतीने आणि उद्देशांसाठी Google द्वारे तुमच्या माहितीच्या प्रक्रियेला तुम्ही संमती देता.
इतर स्रोतांकडून आम्ही संकलित करत असलेली माहिती
आम्ही इतर स्त्रोत किंवा व्यक्तींकडून तुमच्याबद्दल माहिती संकलित करू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही ब्लॉग, चॅट रूम, किंवा सामाजिक नेटवर्क यांना सादर केलेली माहिती आम्ही संकलित करू शकतो. आम्ही इतर कंपन्या, ग्राहक, संस्था किंवा तृतीय पक्ष भागीदार यांच्याकडूनही माहिती संकलित करू शकतो.
आम्ही तुमची माहिती कशी वापरतो
तुमच्याकडून आम्ही संकलित करत असलेली कोणतीही माहिती ही खालीलपैकी कोणत्याही मार्गाने वापरली जाऊ शकते:
- तुमचा अनुभव वैयक्तिकृत करण्यास (तुमची माहिती तुमच्या व्यक्तिगत गरजांना अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्यास आम्हाला मदत करते)
- आमच्या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यास (आम्ही तुमच्याकडून प्राप्त झालेल्या माहिती आणि अभिप्राय यांच्या आधारावर आमच्या वेबसाईट ऑफरिंगमध्ये सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो)
- ग्राहक सेवा सुधारण्यास (तुमच्या ग्राहक सेवा विनंत्या आणि साहाय्यता गरजा यांना अधिक परिणामकारकपणे प्रतिसाद देण्यासाठी तुमची माहिती आम्हाला मदत करते)
- स्पर्धा, प्रचार, सर्वेक्षण आणि इतर साईट वैशिष्ट्य यांना प्रशासित करण्यास
- नियतकालाने ईमेल पाठवण्यास (टिप: कोणत्याही वेळी तुम्ही भविष्यातील ईमेल प्राप्त करण्यापासून सदस्यत्व रद्द करू इच्छित असल्यास, आम्ही प्रत्येक ईमेलच्या तळाशी तपशीलवार सदस्यता रद्द करण्याच्या सूचना समाविष्ट करतो). तुम्ही आम्हाला प्रदान केलेला ईमेल पत्ता केवळ तुम्ही प्रदान केलेल्या उद्देशांसाठीच वापरला जाईल.
PII आणि PHI यांचा वापर आणि प्रकटन
PII जी चिकित्सालयीन संशोधन अभ्यास प्रश्नावलीच्या मार्गे संकलित केली जाऊ शकणारी माहिती आहे ती त्या व्यक्तीकडे मागोवा घेत जाऊ शकते. PHI ही तुमच्या PII चे ज्ञात आरोग्य वैशिष्ट्यांसह एकत्रिकरण आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा विशिष्ट आजार किंवा स्थिती आहे असे तुम्ही दर्शविल्यास, जेव्हा ती माहिती तुमच्या नावासह एकत्र केली जाते, तेव्हा ती PHI बनते. PII च्या उदाहरणांमध्ये तुमचे नाव, घरचा पत्ता, टेलिफोन क्रमांक, ईमेल पत्ता, जन्मतारीख आणि या ओळखण्याच्या माहितीला लिंक केलेली कोणतीही अन्य माहिती यांचा समावेश आहे.
तुम्ही PII आणि/किंवा PHI ऐच्छिकपणे प्रदान करू शकता आणि तुम्ही याची निवड केल्यास, या गोपनीयता-धोरणामध्ये वर्णन करण्यात आलेल्या अशा माहितीच्या आमच्या संकलनाला आणि वापराला तुमची संमती आहे. आमच्या वेबसाईटवर तुम्ही प्रविष्ट केलेल्या कारणासाठीच फक्त आम्ही तुमची PII आणि PHI वापरू. तुम्ही Rebar Interactive ला सादर करत असलेल्या PII आणि PHI च्या अचूकतेची खात्री करण्यास तुम्ही जबाबदार असाल. ज्या कारणासाठी तुम्ही माहिती प्रदान करत आहात त्या उद्देशाच्या गुणवत्तेवर आणि प्रामाणिकतेवर चुकीची माहिती परिणाम करेल.
तुम्ही आमच्या काही वेबसाईट या PII प्रदान न करता पाहू शकत असताना, ही माहिती संशोधन अभ्यासामध्ये सहभागी होण्याची पात्रता ठरवण्यासाठी, इतर आवश्यक उद्देशांमध्ये आवश्यक असेल.
या गोपनीयता-धोरणामध्ये वर्णन करण्यात आलेल्या उद्देशांव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी आमच्या चिकित्सालयीन संशोधन अभ्यासाच्या वापरकर्त्यांची PII किंवा PHI आम्ही वापरणार किंवा प्रकट करणार नाही. ते वापर कोणत्याही क्षणी बदल्यास, आम्ही आमच्या वेबसाईटवर गोपनीयता-धोरण अद्यतनित करू. आम्ही खालील मार्गाने वापरकर्त्यांकडून प्राप्त केलेली PII आणि PHI वापरू आणि प्रकट करू:
अभ्यास संदर्भीय पूर्व-पात्रतेशी संबंधित आणि/किंवा अन्य अभ्यास संबंधित उद्देश यांच्याशी संबंधित संवाद
Rebar Interactive द्वारे अभ्यासामधील तुमच्या सहभागासाठीच्या पूर्व-पात्रतेसाठीच्या पाठपुराव्यासाठी PII आणि PHI वापरली जाईल आणि अभ्यासामधील तुमच्या सहभागासाठी आणि तुमच्या पात्रतेच्या मूल्यमापनासाठी चिकित्सालयीन अभ्यास साईट सोबत शेअर केली जाऊ शकते.
अभ्यास भरती प्रयत्नांना साहाय्य करणारे एजंट आणि सेवा प्रदाते
आम्ही काही वेळा आमच्या चिकित्सालयीन अभ्यास वेबसाईटची आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आमच्या वतीने आमच्या अभ्यास भरती प्रयत्नांना साहाय्य म्हणून संकलित केलेल्या डेटाची देखभाल करण्यासाठी वेब होस्टिंग कंपन्यांची नियुक्ती करतो. तुमचे नाव, आजार किंवा स्थिती, घरचा पत्ता, टेलिफोन नंबर, ईमेल अॅड्रेस, जन्मतारीख आणि या ओळखणाऱ्या माहितीला जोडलेली कोणतीही अन्य माहिती यासारखी तुमची व्यक्तिगत माहिती, आम्ही या होस्टिंग कंपन्यासह शेअर करू शकतो ज्यामुळे त्या आमच्यासाठी अशा वेब होस्टिंग सेवा प्रदान करू शकतील. आम्ही तुमची व्यक्तिगत माहिती ज्यांच्यासह शेअर करतो त्या कंपन्या आणि व्यक्तींच्या संदर्भात, आम्ही व्यावसायिकरीत्या वाजवी प्रयत्नांची खात्री करतो की त्या कंपन्या आणि व्यक्ती या गोपनीयता-धोरणाला किंवा या गोपनीयता-धोरणामध्ये दर्शविल्यासारख्याच गोपनीयता पद्धतींना चिकटून राहतील.
कायदा आणि विनियमक यांचे पालन करण्यासाठी, शोध वॉरंटना, कोर्टासमोर हजर राहण्याच्या हुकुमाला, कोर्टाच्या आदेशाला किंवा इतर वैध कायदेशीर प्रक्रिया किंवा सार्वजनिक प्राधिकरणांद्वारे करण्यात आलेल्या कायदेशीर विनंत्यांना प्रतिसाद म्हणून देखील आम्हाला PII आणि PHI प्रकट करण्याची आवश्यकता भासू शकते, यामध्ये राष्ट्रीय सुरक्षितता किंवा कायद्याच्या अंमलबजावणीच्या आवश्यकतांना पूर्ण करण्याचा समावेश होतो. आम्हाला तुमची PII किंवा PHI तृतीय पक्षाकडे उघड करण्यास कायदेशीरदृष्ट्या भाग पाडण्याच्या घटनेमध्ये, आम्ही तुम्हाला सूचित करण्याचा, जर त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत नसेल किंवा ते आमच्या कायदेशीर बंधनासह सातत्यपूर्ण नसेल, तर प्रयत्न करू.
प्रकटने ही खालीलपैकी कोणत्याही परिस्थितीमध्ये उचित देखील असू शकतात: (अ) आमच्या कायदेशीर अधिकारांचे किंवा आमच्या वेबसाईटच्या वापरकर्त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यास, (ब) आमच्या वेबसाईटच्या सुरक्षितता किंवा एकात्मतेचे संरक्षण करण्यासाठी, (क) दायित्वांबाबत सावधगिरी बागळण्यासाठी, (ड) या गोपनीयता-धोरणाची अंमलबजावणी करण्यास, (इ) Rebar Interactive च्या नियंत्रणामध्ये कोणताही बदल झाल्यास, यामध्ये विलीनीकरणाचे प्रकार, तिच्या सर्व मालमत्तांपैकी सर्वांचे अधिग्रहण किंवा खरेदीचा समावेश होतो, (फ) घोटाळा शोधण्यास, रोखण्यास किंवा अन्यथा संबोधित करण्यास, (ग) तुमच्या स्पष्ट मंजुरीच्या अनुरोधाने किंवा (ह) भौतिक सुरक्षितता धोक्यात आहे असा विश्वास असल्यास आणीबाणीच्या दरम्यान.
ईयु, युनायटेड किंगडम आणि स्वीस व्यक्तींचा डेटा तृतीय पक्षांना हस्तांतरित करण्याच्या प्रकरणामध्ये, ईयु-युएस आणि स्वीस-युएस गोपनीयता कवच प्राप्त होईल, आम्ही हानीमध्ये वाढ करणारा पक्ष नाही हे आम्ही सिद्ध न केल्यास Rebar Interactive हे उत्तरदायी असतील.
मुलांची गोपनीयता
आम्ही मुलांची गोपनीयता संरक्षित करण्यास वचनबद्ध आहोत. Rebar Interactive किंवा त्यांच्या कोणत्याही वेबसाईट किंवा सेवा वयाच्या 13 वर्षाखालील मुलांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने किंवा त्या हेतूने डिझाईन करण्यात आलेल्या नाहीत. आम्ही अशा कोणत्याही व्यक्तीची PHI किंवा PII संकलित करत नाही, तशी विनंती किंवा वापर करीत नाही, ज्यांचे वय 13 हून कमी असल्याची आम्हाला वास्तविक माहिती आहे, जोपर्यंत मुलांचे पालक किंवा आई/वडील यांची आम्हाला संमती मिळालेली नसते. जर आम्हाला समजले की आम्ही मुलांच्या पालकांच्या किंवा आईवडिलांच्या संमतीशिवाय 13 वर्षे वयाच्या खालील कोणत्याही मुलांची PII संकलित केली आहे, तर आम्ही शक्य तितक्या लवकर ती माहिती हटवण्याचा प्रयत्न करू.आम्ही वय वर्षे 13 च्या खाली कोणत्याही बालकाची PHI किंवा PII संकलित केली आहे असा संशय घेण्याचे तुमच्याकडे कोणतेही कारण असल्यास कृपया Rebar Interactive शी [email protected] किंवा (888) 526-0867 येथे संपर्क साधा.
डेटा सुरक्षितता
अनधिकृत किंवा बेकायदेशीर प्रक्रिया केली जाणे आणि अपघाताने गहाळ होणे, फेरफार केली जाणे, उघड करणे आणि अॅक्सेस करणे यापासून PHI आणि PII ची सुरक्षा करण्यासाठी आम्ही सर्वसाधारणपणे स्वीकार्य उद्योगांतील प्रमाण तांत्रिक, भौतिक आणि संस्थात्मक पद्धती राखतो. तथापि, कृपया नोंद घ्या की, इंटरनेटवर माहितीच्या प्रसारणामध्ये आणि माहिती इलेक्ट्रॉनिक संग्रहणामध्ये अंतर्भूत धोके असतात आणि आम्ही तुमच्या PII किंवा PHI च्या अनधिकृत वापराची किंवा अॅक्सेसची हमी देत नाही.
तृतीय पक्षांसह माहिती शेअर करणे
आम्ही बाहेरील पक्षांना तुम्हाला व्यक्तिगतरीत्या ओळखणाऱ्या माहितीची विक्री, व्यापार किंवा अन्यथा हस्तांतरण करत नाही. यामध्ये विश्वासार्ह तृतीय पक्षांचा समावेश नाही ज्या आम्हाला आमच्या वेबसाईट ऑपरेट करण्यात, आमचा व्यवसाय चालवण्यास किंवा तुमची सेवा करण्यात, साहाय्य करतात, जोपर्यंत ते पक्ष ही माहिती गोपनीय म्हणून ठेवण्यास सहमत असतात. कायद्याचे किंवा विनियमकाचे पालन करण्यास किंवा शोध वॉरंटला, कोर्टासमोर हजर राहण्याच्या हुकुमाला किंवा कोर्टाच्या आदेशाला प्रतिसाद देण्यासाठी आम्हाला PII आणि PHI प्रकट करावी लागू शकते. आम्हाला तुमची PII किंवा PHI तृतीय पक्षाकडे उघड करण्यास कायदेशीरदृष्ट्या भाग पाडण्याच्या घटनेमध्ये, आम्ही तुम्हाला सूचित करण्याचा प्रयत्न करू, जर त्यामुळे कायद्याचे किंवा न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन होत नसेल. आमच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्यास, आमच्या वेबसाईटची सुरक्षितता किंवा एकात्मता संरक्षित करण्यास, दायित्वाच्या विरोधात सावधगिरी बाळगण्यास, किंवा भौतिक सुरक्षितता धोक्यात आहे असा विश्वास वाटल्यास आणीबाणीच्या काळात प्रकटने ही देखील उचित असू शकतात. या प्रकारची प्रकटने उद्भवण्याची शक्यता कमी आहे, मात्र त्यांची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला आम्ही जाणीव करू देऊ इच्छितो.
जाहिरातदार
आम्हाला तुमच्या स्वारस्यांच्या आधारावर आणि तुमच्याशी संबंधित असलेली (“स्वारस्य आधारित जाहिराती”) सामग्री प्रदर्शित करण्यास, आमच्या ब्रॅण्डची जाहिरात करण्यास साहाय्य करण्यासाठी आम्ही वेळोवेळी जाहिरातदार सेवांना सहभागी करून घेऊ. या सेवा आमच्या वेबसाईट त्याचप्रमाणे कुकीजवर आधारित तृतीय पक्षांच्या वेबसाईट किंवा आमच्या सेवांसह मागील आंतरक्रिया दर्शवणारी इतर माहिती यावर जाहिराती लक्ष्य करू शकतात. हे तृतीय पक्ष तुम्ही बराच काळ आमच्या सेवांच्या केलेल्या वापरापासून माहिती संकलित करू शकतात आणि ती माहिती वेगवेगळ्या वेबसाईट आणि ऑनलाईन सेवा यावरील तुमच्या अॅक्सेसबद्दलच्या माहितीसह एकत्रित केली जाऊ शकते. हे तृतीय पक्ष जाहिरातदार हे नेटवर्क अॅडव्हर्टायझिंग इनिशएटिव आणि/किंवा डिजीटल अॅडव्हर्टायझिंग अलायन्स मध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये सहभागी संस्थाच्या जाहिरात लक्ष्यामधून वापरकर्त्यांना बाहेर राहता येते. स्वारस्य-आधारित जाहिरातीबद्दल अधिक जाणून घेण्यास, किंवा वर्तनात्मक जाहिरात उद्देशांपासून विशिष्ट तृतीय पक्षांनी तुमची माहिती बाहेर ठेवण्याचे निवडण्यासाठी, येथे www.aboutads.info/choices किंवा http://www.networkadvertising.org/choices/ येथे जा.
कृपया नोंद घ्या की जेव्हा तुम्ही स्वारस्य-आधारित जाहिराती प्राप्त करण्यापासून बाहेर राहण्याचे निवडता, तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही आमच्याकडून यापुढे जाहिरात पाहणार नाही.
सामाजिक माध्यम, जाहिराती आणि प्लग-इन्स
आम्ही एकाधिक सामाजिक माध्यम प्लॅटफॉर्मवर (म्हणजेच Facebook आणि Instagram) पाहुण्यांसह सहभागी होतो. तुम्ही आम्हाला या आमच्या सामाजिक माध्यमांच्या प्लॅटफॉर्मपैकी एकावर आमच्याशी संपर्क साधल्यास, पाहुण्या सेवेला सामाजिक माध्यमामार्फत विनंती केल्यास किंवा अन्यथा तुमच्याशी सामाजिक माध्यमाद्वारे संपर्क साधण्यास निर्देशित केल्यास, आम्ही तुमच्याशी थेट संदेशाद्वारे किंवा अन्य सामाजिक माध्यम साधने वापरून संवाद साधू. या प्रसंगांमध्ये, तुमचा आमच्यासह केलेला संवाद हा गोपनीयता-धोरणाने त्याचप्रमाणे तुम्ही वापरत असलेल्या सामाजिक माध्यमांच्या गोपनीयता-धोरणाने नियंत्रित केला जातो. आम्ही सामाजिक माध्यम प्लॅटफॉर्म आणि इतर वेबसाईट यांच्या माध्यमातून लक्षित जाहिराती प्रदर्शित करू शकतो. या जाहिराती अशा लोकांच्या समुहाला पाठविल्या जातात जे व्यावसायिक स्वारस्ये आणि लोकसंख्याविषयक माहिती यासारखे विशेष गुण शेअर करतात.
आमच्या ऑनलाइन सेवा सामाजिक माध्यम प्लग-इन्सचा (म्हणजेच Facebook चे “आवडले”, “Twitter वर शेअर करा” बटण) वापर तुम्हाला विशिष्ट सामाजिक माध्यम प्लॅटफॉर्म्सशी (म्हणजेच Facebook, Twitter, Instagram) सहजपणे संवाद साधता येण्यासाठी आणि इतरांसह माहिती शेअर करण्यासाठी करू शकतात. जेव्हा तुम्ही आमच्या ऑनलाइन सेवांना भेट देता, उपलब्ध असलेल्या सामाजिक माध्यम प्लगइनचे ऑपरेटर, तुमच्या उपकरणावर कुकीज ठेवू शकतात ज्यामुळे अशा ऑपरेटरना आमच्या ऑनलाइन सेवांना आधी भेट दिली होती अशा व्यक्तींना ओळखता येते. आमच्या ऑनलाइन सेवांना भेट देत असताना या सामाजिक माध्यम वेबसाईटमध्ये तुम्ही लॉगइन झालेले असल्यास, तुम्ही आमच्या ऑनलाइन सेवांना भेट दिली होती किंवा इतर माहिती प्राप्त करण्यासाठी सामाजिक माध्यम प्लगइन संबंधित सामाजिक माध्यम वेबसाईटला अनुमती देतात. सामाजिक माध्यम प्लगइन्स हे लागू असलेल्या सामाजिक माध्यम वेबसाईटना तुमच्या आमच्या ऑनलाइन सेवांवरील क्रियांबद्दल सामाजिक माध्यम वेबसाईटच्या इतर वापरकर्त्यांसह माहिती शेअर करण्यास अनुमती देतात. उदाहरणार्थ, Facebook सामाजिक प्लगइन्स Facebook ला तुम्हाला तुमच्या “आवडी” आणि टिप्पण्या आमच्या ऑनलाइन सेवांना तुमच्या Facebook मित्रांना दाखवण्याची अनुमती देतात. Facebook सामाजिक प्लगइन्स हे तुम्हाला तुमच्या मित्रांच्या Facebook क्रियांना आमच्या ऑनलाइन सेवांवर दाखण्याची अनुमतीदेखील देतात. सामाजिक माध्यम प्लगइन्सपासून येणारी कोणतीही सामग्री आम्ही नियंत्रित करत नाही.
इतर वेबसाईटना लिंक्स
आमच्या वेबसाईटमध्ये इतर वेबसाईटच्या लिंक्सचा समावेश असू शकतो. कृपया लक्षात ठेवा की इतर पक्षाद्वारे ऑपरेट केलेल्या वेबसाईट, आमच्या वेबसाईटवरील लिंक्सच्या माध्यमातून किंवा अन्य प्रकारे जेव्हा तुम्ही अॅक्सेस करता, तेव्हा त्या वेबसाईटवर काय होते यावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते. त्या वेबसाईटचा ऑपरेटर तुमच्याकडून माहिती कशी गोळा करेल आणि त्या वेबसाईटचा ऑपरेटर माहितीचे काय करेल हे तुम्हाला माहीत आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाईटचे गोपनीयता-धोरण नेहमी तपासले पाहिजे.
मागोवा घेऊ नका सिग्नल्स
आम्ही सध्या वेब ब्राउझरच्या “मागोवा घेऊ नका” सिग्नल्स किंवा ग्राहकांना कालांतराने आणि तृतीय पक्षाच्या वेबसाईट किंवा ऑनलाइन सेवांवर वैयक्तिक ग्राहकाच्या ऑनलाइन क्रियांबद्दल माहिती संग्रहित करण्यासाठी निवड करण्याची क्षमता प्रदान करणाऱ्या इतर यंत्रणेच्या संदर्भात प्रतिसाद देत नाही किंवा कोणतीही कारवाई करत नाही.
एकत्रित किंवा न ओळखणारी माहिती
आमच्या वापरकर्त्यांना, व्यावसायिक भागीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी आणि आमच्या सेवा सुधारण्यासाठी, आम्ही वापरकर्ता लोकसंख्याशास्त्र, स्वारस्ये आणि वर्तन यावर संशोधन करू शकतो किंवा ओळखण्यायोग्य व्यक्तिगत माहिती आणि/किंवा आम्ही एकत्रित केलेल्या किंवा ओळखल्या न जाणाऱ्या माहितीवर आधारित इतर क्रियांमध्ये सहभागी होऊ शकतो. एकत्रित किंवा न ओळखणारी माहिती ही व्यक्तिगत माहिती मानली जात नाही आणि वापरकर्त्यास व्यक्तिगतरीत्या ओळखत नाही. आम्ही ही एकत्रित किंवा न ओळखणारी माहिती आमच्या सहयोगी, एजंट, व्यवसाय भागीदार आणि/किंवा इतर तृतीय पक्षांसह शेअर करू शकतो.
इंटरनेट प्रसारण जोखमी
आम्ही कबूल करतो की कोणतेही इंटरनेट प्रसारण कधीही 100% सुरक्षित किंवा त्रुटीमुक्त नसते. तुम्ही वापरत असलेला संगणक पुरेसा सुरक्षित आणि दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर, ट्रोजन हॉर्स, संगणक व्हायरस आणि वर्म प्रोग्राम्सपासून संरक्षित आहे याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे. संगणकावर पुरेशा सुरक्षा उपायांशिवाय, तुम्ही प्रदान केलेली माहिती अनधिकृत तृतीय पक्षांना उघड केली जाण्याची जोखीम असते. त्याचप्रमाणे, वर नमूद केल्याप्रमाणे, तुमच्या PII आणि PHI चे संरक्षण करण्यासाठी Rebar Interactive चे प्रयत्न असूनही, अनधिकृत तृतीय पक्षाला आमच्या सुरक्षा प्रणालींभोवती मार्ग सापडण्याचा किंवा इंटरनेटवरील तुमच्या माहितीचे प्रसारण रोखले जाण्याचा धोका नेहमीच असतो.
माहितीमध्ये प्रवेश, सुधारणा करण्याचे आणि हटविण्याचे अधिकार
EU आणि स्विस व्यक्तीचा त्यांच्या व्यक्तिगत डेटामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार Rebar Interactive मान्य करते. आम्ही तुमच्याबद्दल राखत असलेल्या PII आणि PHI मध्ये आम्ही तुम्हाला वाजवी प्रवेश प्रदान करतो. कोणत्याही कायदेशीर आवश्यकतांच्या अधीन राहून, तुम्हाला चुकीची माहिती दुरुस्त करण्याची, सुधारणा करण्याची किंवा हटवण्याची वाजवी संधी दिली जाते. खाली नमूद केल्याप्रमाणे तुम्ही गोपनीयता संपर्काशी संपर्क साधून असे करू शकता आणि आम्ही वाजवी कालमर्यादेत प्रतिसाद देऊ.
सूचना बदला
गोपनीयता कायदे आणि नियम विकसित होत असताना, सूचना न देता आमच्या गोपनीयता-धोरणात सुधारणा करणे किंवा अद्यतनित करणे आवश्यक असू शकते. तुमच्या शेवटच्या भेटीपासून या धोरणाच्या “प्रभावी तारखेचा” संदर्भ घेऊन या गोपनीयता-धोरणात सुधारणा केली गेली आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. आमच्या वेबसाईटचा तुमचा वापर हा सुधारित गोपनीयता-धोरणाच्या अटींची तुमची स्वीकृती आहे आणि म्हणून तुम्हाला त्याच्या अटींची जाणीव असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही गोपनीयता-धोरणाचे नियमितपणे पुनरावलोकन केले पाहिजे.
PII आणि PHI राखून ठेवणे
जो पर्यंत लागू असलेल्या कायद्या(द्यां)प्रमाणे आवश्यक आहे किंवा ज्या उद्देशा(शां)साठी PII आणि PHI संकलित केली किंवा तिच्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे त्यासाठी आवश्यक असेपर्यंतच आम्ही ती राखून ठेवू. असा कालावधी समाप्त झाल्यानंतर आम्ही PII आणि PHI हटवू.
आंतरराष्ट्रीय हस्तांतरण
व्यक्तिगत डेटाच्या संरक्षणाच्या संदर्भात लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे, विनियमकांचे, आणि अनिवार्य सरकारी मानकांचे पालन करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
आम्ही एक जागतिक संस्था असल्याने, व्यक्तिगत डेटा आणि सादर केलेली कोणतीही अतिरिक्त माहिती ही जागतिक स्तरावर रुग्ण भरतीच्या संदर्भात किंवा CRO, चिकित्सालयीन परीक्षणाचे प्रायोजक, चिकित्सालयीन संशोधन साईट्स आणि इतर भागीदारांसह संवाद साधताना वापरली जाऊ शकते. म्हणून, व्यक्तिगत डेटा जगभरातील अशा संस्थांकडे हस्तांतरित केला जाऊ शकतो, जेथे या गोपनीयता-धोरणानुसार आणि प्रत्येक देशात लागू असलेल्या कायद्यांनुसार त्यावर प्रक्रिया केली जाईल. ज्या देशांमध्ये आम्ही डेटावर प्रक्रिया करतो त्यांचे कायदे भिन्न असू शकतात आणि कदाचित तुमच्या स्वतःच्या देशाच्या कायद्याप्रमाणे संरक्षणात्मक नसतील.
आम्ही तुमचा व्यक्तिगत डेटा तुमच्या न्यायाधिकारक्षेत्राबाहेर हस्तांतरित केल्यास, आम्ही योग्य सुरक्षा उपाय लागू करू आणि तुमचा व्यक्तिगत डेटा संरक्षित केला आहे याची खात्री करण्यासाठी सीमेपलीकडे कायदेशीररित्या डेटा हस्तांतरित करण्यासाठी सर्वत्र स्वीकृत यंत्रणेवर अवलंबून राहू.
ईयु व्यक्तींसाठी: जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशनखाली तुमचे अधिकार
Rebar Interactive आपल्या ग्राहकांच्या वतीने एक डेटा “प्रोसेसर” म्हणून काम करतात, जे त्यांच्या ग्राहकांच्या वतीने व्यक्तिगत डेटावर प्रक्रिया करतात ज्यामध्ये मर्यादेविना, चिकित्सालयीन परीक्षण प्रायोजक, चिकित्सालयीन संशोधन संस्था आणि संशोधन साईट्स यांचा समावेश होतो. आमच्या ग्राहकांच्या चिकित्सालयीन संशोधन वेबसाईटपैकी एकावर दिसणाऱ्या संशोधन अभ्यासामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यात तुम्हाला स्वारस्य असल्यास, आम्ही विनंती करतो की संबंधित संशोधन अभ्यासाच्या किंवा कार्यक्रमाच्या भरतीच्या उद्देशांसाठी तुमच्या व्यक्तिगत डेटाच्या संकलनाला आणि प्रक्रिया करण्याला स्पष्टपणे संमती देण्याचा पर्याय तुम्ही तुमचा व्यक्तिगत डेटा प्रदान करण्यापूर्वी निवडावा. खास करून, संशोधन अभ्यास किंवा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या नोंदणी करण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान (ज्यामध्ये पात्रतापू्र्व सर्वेक्षण पूर्ण करण्याचा समावेश आहे), नोंदणीदरम्यान (जसे लागू असेल तसे) आमच्या चिकित्सालयीन संसोधन वेबसाईटवर जसे वर्णन करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे आणि/किंवा या गोपनीयता-धोरणामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे तुमच्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेला होकारार्थी संमती दर्शवण्याची तुम्हाला संधी असेल.
GDPR खाली तुमचे अधिकार खालीलप्रमाणे असतील.
- सूचित केले जाण्याचा अधिकार – तुम्हाला अशी विनंती करण्याचा अधिकार आहे की आम्ही तुम्हाला तुमच्या डेटाच्या प्राप्तकर्त्यांच्या श्रेणी किंवा कोणत्याही प्राप्तकर्त्याबद्दल सूचित करावे;
- अॅक्सेस करण्याचा अधिकार – आम्ही राखत असलेल्या तुमच्या व्यक्तिगत डेटाच्या प्रती मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे (या सेवेसाठी आम्ही तु्म्हाला छोटे शुल्क आकारू शकतो);
- दुरुस्ती करण्याचा अधिकार – तुम्हाला चुकीची वाटत आहे अशी कोणतीही माहिती दुरुस्त करण्याची विनंती करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला जी माहिती अपूर्ण आहे असे वाटत आहे, अशी माहिती पूर्ण करण्याची विनंती करण्याचा अधिकार देखील तुम्हाला आहे;
- खोडून टाकण्याचा अधिकार – काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आम्ही तुमचा व्यक्तिगत डेटा खोडून टाकवा अशी विनंती करण्याचा तुम्हाला अधिकार आहे;
- प्रक्रिया करणे प्रतिबंधित करण्याचा अधिकार – तुमच्या व्यक्तिगत डेटावर आम्ही करत असलेल्या प्रक्रियेला, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रतिबंधित करण्याचा तुम्हाला अधिकार आहे;
- डेटा पोर्ट करण्याचा अधिकार – आम्ही संकलित केलेला डेटा दुसऱ्या संघटनेला, किंवा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये थेट तुम्हाला हस्तांतरित करण्याची विनंती करण्याचा अधिकार तुम्हाला आहे; आणि
- आक्षेप घेण्याचा अधिकार – तुमच्या व्यक्तिगत डेटावर आम्ही करत असलेल्या प्रक्रियेवर, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आक्षेप घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
तुमचा डेटा आम्ही ज्या प्रकारे हाताळत आहोत त्यामध्ये समस्या आहे असे वाटत असल्यास तुम्ही स्थित असलेल्या ईयु सदस्य राज्यामधील निरीक्षक प्राधिकरणाकडे चिंता व्यक्त करण्याचा किंवा तक्रार दाखल करण्याचादेखील तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला निरीक्षक अधिकाऱ्यांची यादी येथे मिळू शकते: http://ec.europa.eu/justice/article-29/structure/dataprotection-authorities/index_en.htm.
गोपनीयता संपर्क माहिती
या गोपनीयता-धोरणाच्या किंवा आमच्या पद्धतीच्या संदर्भातील प्रश्न किंवा टिप्पण्या येथे सादर करण्यात याव्यात:
Rebar Interactive
Attn: Privacy Officer
13809 Research Blvd.
Suite 500, PMB 101526
Austin, Texas 78750
USA
अधिकार राखून ठेवणे
कायद्याद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे किंवा सरकारी प्राधिकरणांच्या माहितीच्या विनंत्यांना योग्य प्रकारे प्राधिकृत करण्यासाठी व्यक्तीची माहिती सामायिक करण्याचा अधिकार Rebar Interactive राखून ठेवते.